
बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या आठवड्यात बाहेर निघालेली उर्फी जावेद सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. उर्फीच्या बोल्ड लूकच्या चर्चा सर्वत्र आहेत.

काही दिवसांपूर्वी, उर्फी विमानतळावर ब्रा फ्लॉन्ट करताना दिसली होती, त्यानंतर लोकांनी तिला जोरदार क्लास घेतला. आता तिनं बॅकलेस कपडे परिधान केल्यानं ती पुन्हा ट्रोल झाली आहे.

अनेक लोकांना उर्फीचा ग्लॅमरस लूक आवडत आहे, तर काही लोक उर्फीला असे कपडे परिधान केल्याबद्दल ट्रोल करत आहेत.

उर्फीला ट्रोल करणारे लोक सोशल मीडियावर तिला हिजाब घालण्याचा सल्ला देत आहेत. तसेच ती धर्माला बदनाम करत असल्याचेही आरोप तिच्यावर करण्यात येत आहेत.

नुकतंच तिला विमान तळावर स्पॉट करण्यात आलं तेव्हा तिनं हा ड्रेस परिधान केला होता. आता तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.