
अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट सध्या सोशल मीडियावर धमाल करताना दिसतेय.

येत्या 30 जुलैला प्रियाचा ‘सिटी ऑप ड्रीम्स 2’ ही वेब सिरीज रिलीज होणार आहे. त्यामुळे सध्या प्रिया प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

आता प्रियानं प्रमोशन दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. निळ्या रंगाच्या हटके ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे. एवढंच नाही तर तिनं हे फोटो शेअर करताना ‘सिटी ऑप ड्रीम्स 2 चं प्रमोशन करतानाची पौर्णिमा गायकवाड’ असं कॅप्शनही दिलं आहे.

प्रिया प्रामुख्यानं मराठी चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये झळकली आहे. शिवाय आता '..आणि काय हवं' या वेबसीरिजच्या माध्यमातूनही तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. लवकरच या सीरिजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बाबासाहेब आंबेडकर , भेट, मुन्ना भाई M.B.B.S, लगे राहो मुन्ना भाई, आनंदी आनंद, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, काकस्पर्श, टाईम प्लीज, आंधळी कोशिंबीर, हॅपी जर्नी, वजनदार, टाईमपास 2 या चित्रपटांमध्ये प्रियानं आपल्या अभिनयाची छाप पाडली.