
नुकतंच बिग बॉस 15 चा कार्यक्रम मध्य प्रदेशच्या जंगलात पार पडला आहे. या कार्यक्रमाला सलमान खान गैरहजर होता मात्र तो झूमच्या माध्यमातून मीडियाशी कनेक्ट झाला. त्याच्या अनुपस्थितीत, हा कार्यक्रम बिग बॉसची माजी स्पर्धक आरतीचा सिंह आणि देवोलीना भट्टाचार्य यांनी होस्ट केला. या कार्यक्रमाचे काही खास फोटो समोर आले आहेत, ते पाहूयात.

हा शो टीव्हीवर कधी आणि कसा प्रसारित केला जाईल आणि यावेळी या शोमध्ये आणखी काय विशेष असणार आहे हे सगळं आरती सिंह आणि देवोलीना भट्टाचार्य यांनी स्टेजवर सांगितलं. सलमान खान सध्या रशियामध्ये त्याच्या टायगर 3 चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

आरती सिंह याठिकाणी खूपच सुंदर दिसत होती, अभिनेत्री आणि बिग बॉसची माजी स्पर्धकने मरुन रंगाचा ड्रेस घातला होता.

आरती सिंहनं येथे मीडियाला चांगलंच हसवलं आणि त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरंही दिली.

देवोलीना भट्टाचार्यची खास स्टाईल बिग बॉस 15 च्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये दिसली तिने ब्लॅक अँड व्हाईट ओव्हरकोट घातला होता. देवोलीना या शोसाठी खूप उत्साहित आहे.

शो दरम्यान, या दोघींनी एकत्र सांगितलं की 2 ऑक्टोबरपासून बिग बॉस 15 सुरू होणार आहे. हा शो सोमवारी टीव्हीवर साडेदहा वाजता सुरू होईल, तर वीकेंडला, हा शो टीव्हीवर रात्री 9:30 वाजता प्रसारित केला जाईल.