
कलर्स टीव्हीचा रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' चांगलेच रंगात आले असून बिग बॉस 16 ला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम देखील मिळतंय.

बिग बॉस 16 च्या घरात जोरदार हंगामा होताना सध्या दिसतोय. अब्दू बिग बॉस 16 च्या घरातील सर्वात आवडता स्पर्धक बनलाय.

बिग बॉस 16 च्या घरात सलमान खानसोबत रश्मिका मंदाना आणि नीना गुप्ता आल्या होत्या. यावेळी त्यांनी खूप धमाल देखील केलीय.

रश्मिका मंदानासोबत सलमान खानने सामी सामी गाण्यावर जबरदस्त असा डान्स केला. हा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

रश्मिका तिच्या आगामी गुड बाय या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी बिग बॉसच्या सेटवर पोहचली होती. या चित्रपटात रश्मिकासोबत अमिताभ बच्चन देखील दिसणार आहेत.