
'संडे का वार' मध्ये नेहमी स्पर्धकांचा क्लास घेणाऱ्या करण जोहरकडे स्क्रिनवर आल्यावर बोलण्यासाठी शब्द नव्हते.

काल शोच्या सुरुवातीला करणला सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत भावुक झाला. शो पुढे सुरू करण्यापूर्वी त्यानं सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली.

करण म्हणाला की, सिद्धार्थ शुक्ला हा कलर्स आणि बिग बॉसच्या टीमचा महत्त्वाचा भाग होता. म्हणूनच त्याच्या जाण्याने सर्वांना निशब्द केलं आहे.

करण सिद्धार्थला 'झलक दिखला जा' पासून ओळखत होता, सिद्धार्थनं त्याच्या चित्रपटातही काम केलंय. जवळचा मित्र गमावल्याचं दुःख करणच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.

'शो मस्ट गो ऑन' असं म्हणत करणनं सिद्धार्थला श्रद्धांजली वाहून शो पुढे नेला.

दोन आठवड्यांपूर्वीच सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल बिग बॉस ओटीटी शोचा भाग बनले होते. करण जोहरनं दोघांसोबत खूप मजा केली होती.