
बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाहचा आज वाढदिवस आहे. एका गुजराती कुटुंबातील डेझीकडे बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी आहे.

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी डेझीनं अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. डेझी दहावीत असताना, तिला ‘मिस फोटोजेनिक’च्या नावानं सन्मानित करण्यात आलं होतं. डेझीनं हे विशेष स्थान अगदी लहान वयातच मिळवलं होतं.

डेझीने अनेक वर्षांपासून नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांच्यासोबत काम केलं. तिनं त्यांना जमीन आणि खाकी चित्रपटांमध्ये असिस्ट केलं. शिवाय डेझीनं सलमानच्या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली. तिनं ‘तेरे नाम’ चित्रपटातील ‘लगन लागी’ या गाण्यात पार्श्वभूमी नृत्यांगना म्हणून काम केलं.

यानंतर तिनं 2010 मध्ये वंदे मातरम या अॅक्शन चित्रपटातून अभिनेत्री म्हणून करिअरला सुरुवात केली. डेझीला बॉडीगार्ड या कन्नड चित्रपटातून खरी प्रसिद्धी मिळाली. त्याचबरोबर तिला सर्वाधिक लोकप्रियता सलमान खानच्या जय हो या चित्रपटातून मिळाली. डेझी सलमानसोबत रेस 3 मध्येही दिसली आहे.

बरं, सलमानसोबत काम करूनही, डेझीचा करियर ग्राफ आतापर्यंत काही विशेष राहिलं नाही. ती काही काळ चित्रपटांपासून दूरही आहे. मात्र असं असतं तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट होत असते.