
साऊथचा सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन केवळ एक उत्तम अभिनेताच नाही तर चित्रपट निर्माता, टीव्ही शो होस्ट आणि व्यावसायिकसुद्धा आहे. अक्किनेनी नागार्जुननं आतापर्यंत 100 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त, तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत आहे.

अभिनेता म्हणून लॉन्च होण्यापूर्वी अक्किनेनी नागार्जुननं लक्ष्मी दग्गुबतीशी लग्न केलं. अहवालांनुसार, अक्किनेनी नागेश्वर राव हे लक्ष्मीच्या वडिलांचे चांगले मित्र असल्यानं त्यांनी हा विवाह लावला होता. नागार्जुन आणि लक्ष्मी यांच्या नात्यात पुन्हा समस्या निर्माण झाल्या आणि दोघंही वेगळे झाले. मात्र, वेगळे झाल्यानंतरही दोघंही चांगले मित्र आहेत. लक्ष्मीपासून विभक्त झाल्यानंतर अक्किनेनी नागार्जुननं अमला अक्किनेनीशी लग्न केले.

त्यावेळी अमला तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर होती. 5 चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर दोघं चांगले मित्र झाले आणि नंतर त्यांची मैत्री प्रेमात बदलली. अमेरिकेच्या प्रवासादरम्यान, त्याने अमलाला प्रपोज केलं आणि दोघांनी जून 1992 मध्ये लग्न केलं. नंतर 1994 मध्ये त्यांचा मुलगा अखिलचा जन्म झाला.

दोघांच्या क्यूट छोट्या लव्हस्टोरीबद्दल अभिनेत्री एकदा म्हणाली, प्रेम आणि लग्न हे चित्रपटांसारखं झालं. नागनं मला सरप्राईज केलं. जेव्हा नागनं मला प्रपोज केलं तेव्हा मला वाटलं की मी लांब सुट्टीवर जात आहे आणि ती 20 वर्षांची आहे. तो एक सुंदर प्रवास होता.

दक्षिणात्य स्टार नागार्जुन आहे कोट्यवधींच्या मालमत्तेचा मालक, आलिशान वाहनांची आहे आवड