
चाहते नेहमीच श्वेता तिवारीच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यास इच्छुक असतात. श्वेता तिवारीचे वैवाहिक जीवन कायमच चर्चेत राहिले आहे. आज श्वेता तिवारी 42 वा वाढदिवस साजरा करत आहे.

श्वेता तिवारी ही मुळची बिहारची असून अवघ्या 18 व्या वर्षी श्वेताचे लग्न लावून देण्यात आले होते. श्वेताच्या पहिल्या मुलीचे नाव पलक असे आहे.

श्वेता तिवारीने आयुष्यामध्ये खूप संघर्ष केलाय. इतकेच नाही तर 12 व्या वर्षी देखील श्वेता एका ठिकाणी नोकरी करत होती.

कसौटी जिंदगी की...या मालिकेमधून श्वेताला खरी ओळख मिळालीये. इतकेच नाही तर श्वेताचे चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

श्वेता तिवारी तिच्या अभिनयासोबतच खासगी आयुष्यामुळे देखील प्रचंड चर्चेत राहते. बिग बाॅस 4 मध्ये श्वेता सहभागी झाली होती.