AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला, अमित शाहांच्या भेटीमागचं खरं कारण समोर, मोठ्या हालचालींना वेग

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शाह यांच्या भेटीसाठी तातडीने दिल्लीत पोहोचले असून, पक्ष चिन्ह, आगामी निवडणुका आणि मित्रपक्षाच्या सहकार्याबाबतच्या गोपनीय अहवालावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला, अमित शाहांच्या भेटीमागचं खरं कारण समोर, मोठ्या हालचालींना वेग
eknath shinde amit shah
| Updated on: Mar 17, 2026 | 11:50 AM
Share

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवस विशेष दिल्ली दौऱ्यावर आहे. त्यांच्या या दौऱ्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईत राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच अचानक अधिवेशन सोडून एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे या दौऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

एकनाथ शिंदे अमित शाहांच्या भेटीला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीत राज्यातील प्रलंबित विकासकामांसह आगामी पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांबाबत शिवसेनेची शिंदे गटाची नेमकी भूमिका काय असेल, यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, एनडीए (NDA) घटक पक्षांमधील आगामी संभाव्य फेरबदल आणि समन्वय यावरही या भेटीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत जो खटला सुरू आहे, त्या कायदेशीर लढाईचा आढावाही एकनाथ शिंदे घेणार आहेत. यावेळी ते दिल्लीतील कायदेतज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत. या खटल्याची सद्यस्थिती काय? पक्षाची भक्कम बाजू मांडण्यासाठी पुढील रणनीती काय असणार, यावर या दौऱ्यात विशेष भर दिला जात आहे.

या दौऱ्यात एकनाथ शिंदे हे शिवसेनेने तयार केलेला एक विशेष अंतर्गत अहवालही अमित शाहांकडे देणार असल्याचे बोललं जात आहे. गेल्या ३ निवडणुकांमध्ये मित्रपक्षाकडून (भाजप) स्थानिक पातळीवर अपेक्षित सहकार्य मिळालेले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या अनेक उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. हा अहवाल एकनाथ शिंदे स्वतः भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे सोपवणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय गोटात आहे.

तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या या अचानक दिल्ली दौऱ्यावर खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हा दौरा पूर्वनियोजित असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “हा दौरा अचानक नाही. अधिवेशन काळात उपमुख्यमंत्री वारंवार दिल्लीला येत असतात. मुख्यत्वे करून संसदेच्या बजेट सत्रात महाराष्ट्राशी संबंधित विषयांसाठी जास्तीत जास्त आर्थिक तरतूद कशी करून घेता येईल, यासाठी खासदारांशी चर्चा करण्यासाठी शिंदे येथे आले आहेत. उर्वरित भेटींबाबत ते स्वतः उद्या सविस्तर माहिती देतील, असे नरेश म्हस्के यांनी म्हटले.

Follow Us
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच