AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Cylinder Shortage: गॅस तुटवड्यावर सरकारची अजून ‘एक मात्रा’; पेट्रोल पंपावर केरोसिन देणार? मंत्री छगन भुजबळ यांची मोठी घोषणा

Chhagan Bhujbal Big Announcement: सरकार गॅस तुटवडा नसल्याचा दावा करत असले तरी गॅस एजन्सीबाहेरील ग्राहकांच्या रांगा बरंच काही सांगून जात आहेत. ग्राहकांनी गॅस सिलेंडरला पर्याय शोधला आहे. तर आता सरकारकडूनही एक मोठा पर्याय समोर आणण्यात आला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी काय केली मोठी घोषणा?

LPG Cylinder Shortage: गॅस तुटवड्यावर सरकारची अजून 'एक मात्रा'; पेट्रोल पंपावर केरोसिन देणार? मंत्री छगन भुजबळ यांची मोठी घोषणा
छगन भुजबळ, एलपीजी सिलेंडर, केरोसीन Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 17, 2026 | 11:52 AM
Share

LPG Cylinder Shortage Kerosene: आखाती युद्धाचे चटके भारतातील सर्वसामान्यांना बसत आहेत. मध्य-पूर्वेतील युद्धाची राज्यातील अनेक उद्योगांना, हॉटेल व्यावसायिक, टपरी चालकांपासून ते सामान्य जनतेला मोठा फटका बसल आहे. गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या भल्या पहाटेपासून लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. तर हॉटेल व्यावसायिकांसह घरातही इंडक्श गॅस, विद्युत शेगडी, चूल असे अनेक पर्याय तसेच सौर ऊर्जेवरील काही साधनांचा वापर वाढला आहे. दरम्यान सरकारने एककीडे गॅस तुटवडा नसल्याचा दावा केला असला तरी गॅस एजन्सीसमोरील वाढती गर्दी पाहता गॅसला एक पर्याय समोर केल आहे. एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने पर्याय म्हणून केरोसिन, रॉकेल वितरण करण्याचा विचार आहे. अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधान परिषदेत याविषयीची घोषणा केली आहे.

पेट्रोल पंपावर केरोसिन वितरण?

पूर्वी रॉकेलचा काळाबाजार होत असल्याची सातत्याने ओरड होत होती. त्यानंतर घरोघरी धूर रहित स्वयंपाकासाठी आणि अवलंबित्व कमी करण्यासाठी रॉकेलचा वापर कमी झाला. पांढरं असो की निळं, कोणतंही रॉकेल लवकर उपलब्ध होत नाही. पण सध्याची इंधन टंचाई लक्षात घेता सरकारने पुन्हा जुनाच पर्याय समोर आणला आहे. एलपीजीला पर्यायी इंधन देण्याची तयारी राज्य सरकार करत आहे. पेट्रोल पंपावर केरोसीन वाटप करण्याबाबत सरकार चाचपणी करत आहे.

ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट

पुणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचे चित्र अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. गॅस घेण्यासाठी नागरिकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. दरम्यान, यांच्या वतीने गॅस एजन्सींना केवळ OTP प्रणालीद्वारे सिलेंडर वितरण करण्याचे तसेच 96 तासांच्या आत ग्राहकांना गॅस पुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी देण्यात आले आहेत. यासोबतच गोदाम, गॅस एजन्सी किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून थेट गॅस विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच दिसून येत असून अनेक ठिकाणी नागरिकांना काळ्या बाजारातून तब्बल 400 रुपयांपर्यंत अधिक दराने गॅस घ्यावा लागत असल्याची तक्रार समोर येत आहे. ऑनलाईन बुकिंग करूनही वेळेत गॅस मिळत नसल्याने नागरिकांना एजन्सीसमोर तासन्तास भर उन्हात रांगेत उभे राहावे लागत आहे.

नागपूरमध्ये राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन

गॅस दरवाढ आणि गॅस तुटवडा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून धरणे आंदोलन करण्यात आले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारला गॅस तुटवड्याबाबत जाब विचारण्यात आला आणि नागरिकांच्या समस्या दूर करण्याची मागणी करण्यात आली.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!