
सनाया इराणीला सगळेच ओळखतात, तिनं छोट्या पडद्यावर आपल्या अतुलनीय अभिनयाने सर्वांना वेड लावलं आहे. आज सनाया 30 वर्षांची झाली आहे. सनायाचा जन्म 17 सप्टेंबर 1983 रोजी झाला होता.

सनाया तिच्या अभिनयामुळे आणि क्यूटनेसमुळे चाहत्यांमध्ये वर्चस्व गाजवते. या टीव्ही अभिनेत्रीने सिडनहॅम कॉलेजमधून एमबीए केलं आहे.

असं म्हणतात की ज्यावेळी ती एमबीए शिकत होती, त्यावेळी तिच्या आईने तिला मॉडेलिंग आणि अभिनय करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने मॉडेलिंगच्या जगात पाऊल ठेवलं.

सनया इराणीने 2006 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. यानंतर तिने अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं. सनाया पहिल्यांदा आमिर खान आणि काजोलच्या सुपरहिट चित्रपट फनामध्ये दिसली होती.

अभिनयाव्यतिरिक्त सनायाने अनेक जाहिरातींमध्येही आपली छाप सोडली आहे. सनायाने शाहरुख खान, सैफ अली खान, प्रियंका चोप्रा आणि करीना कपूर सारख्या अनेक स्टार्ससोबत जाहिरातींमध्ये काम केलं आहे.

सनाया शेवटच्या वेळी 2019 मध्ये होस्टमध्ये दिसली होती, तेव्हापासून सनाया अभिनय जगापासून खूप दूर असल्याचे दिसते.