
बॉलिवूडचे असे अनेक प्रसिद्ध आणि मोठे स्टार्स आहेत, ज्यांचं पूर्वी चांगले आयुष्य नव्हतं, पण त्यांनी मेहनत करून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे, त्यापैकी एक संजय मिश्रा. संजय मिश्रा, एक स्टार ज्याने अनेक छोट्या छोट्या भूमिकांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

संजय मिश्रा आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत, त्यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1963 रोजी झाला होता. 1999 च्या विश्वचषकात संजयने अॅपल सिंगची भूमिका साकारली होती, त्यानंतर चाहत्यांनी त्यांना अॅपल सिंह म्हणून संबोधण्यास सुरुवात केली.

संजय यांनी 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अभिनय केला पण 'मसान' आणि 'आँखों देखी' हे चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट ठरले.

असे म्हटले जाते की वडिलांच्या मृत्यूनंतर संजय यांना धक्का बसला होता, ते त्यांच्या वडिलांच्या खूप जवळ होते. एक काळ होता जेव्हा संजय यांनी सर्व काही सोडून ऋषिकेशला जाण्याचा निर्णय घेतला. एवढंच नाही तर त्यांनी ऋषिकेशमधील एका ढाब्यावर काम करण्यास सुरुवात केली होती.

शेवटी संजय यांना ती संधी मिळाली जेव्हा बॉलिवूडचे अॅक्शन डायरेक्टर रोहित शेट्टीने त्यांना त्याच्या 'ऑल द बेस्ट' चित्रपटात काम करण्याची संधी दिली आणि या चित्रपटाने त्यांच्या कारकिर्दीला एक नवा आयाम दिला.

संजय मिश्रा यांनी 'फस गया ओबामा', 'मिस टनकपूर हाजीर हो', 'प्रेम रतन धन पायो', 'मेरुतिया गँगस्टर्स' आणि 'दम लगा के हयेशा' सारख्या अगणित चित्रपटांमध्ये काम केले आहे.