
गेल्या काही महिन्यांपासून, अनेक बॉलिवूड स्टार्स त्यांच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मालदीवमध्ये पोहोचत आहेत. आता यात अनन्या पांडे दुसऱ्यांदा मालदीवची सफर करण्यासाठी पोहोचली आहे. तिने तिच्या सोशल मीडियावर तिचे काही अतिशय सुंदर फोटो शेअर केले आहेत, हे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

अनन्या पांडे मालदीवमधील तिच्या नवीन फोटोमध्ये प्रचंड हॉट दिसतेय. अनन्यानं पिवळ्या रंगाची चेक प्रिंट बिकिनी परिधान केली आहे.

अनन्याची स्टाईल इतकी किलर आहे की तिचे चाहते या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

अनन्या पांडेनं नुकतंच शकुन बत्रा यांच्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे, त्यानंतर ती सुट्टीसाठी मालदीवला पोहोचली आहे.

अनन्या पांडेचा हा क्यूट अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरतो आहे.