Akshaye Khanna Birthday : हिमालयपुत्र ते संजय बारू… जाणून घ्या अक्षय खन्नाच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरलेल्या भूमिका…

| Updated on: Mar 28, 2022 | 11:09 AM

Akshaye Khanna Birthday : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना याचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त त्याने साकारलेल्या महत्वपूर्ण भूमिका पाहुयात...

1 / 5
बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना याचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या करिअरमधील महत्वाच्या भूमिकांवर एक नजर टाकुयात...

2 / 5
अक्षय खन्नाचा जन्म 28 मार्च 1975 ला मुंबईत झाला.त्याने नमित कपूर अॅक्टिंग स्कूलमधून अभिनयाचे धडे घेतले. 1997 मध्ये हिमालयपुत्र या चित्रपटातून पदार्पण केलं. या चित्रपटाची निर्मिती त्यांचे वडील विनोद खन्ना यांनी केली होती. विशेष म्हणजे या सिनेमातील कामासाठी त्याला फिल्मफेयर अवॉर्डही मिळाला होता.

3 / 5
पुढे त्याचा 'बॉर्डर' सिनेमाही चालला. यात त्याने धरमवीरा हे पात्र साकारलं होतं. 'लावारिस'मधला त्याने साकारलेला कप्तानदादाही अनेकांच्या लक्षात आहे.

4 / 5
'दिल चाहता है'मध्ये त्याने साकारलेला सिद्धार्थ सिन्हा आजही अनेकांच्या लक्षात आहे. त्यानंतर आलेला 'हमराज' सिनेमा आजही सिनेरसिकांच्या मनात आहे. यात अक्षयने करण मल्होत्रा हे पात्र साकारलं होतं.

5 / 5
'आक्रोश' चित्रपटात त्याने सिद्धांत चतुर्वेदी भूमिका केली. याशिवाय 'तीस मार खान', 'नो प्रॉब्लेम', 'दिल्ली सफारी, 'गली गली चोर है',  या चित्रपटांमध्येही त्याने काम केलंय. 2019 मध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या जीवनावर 	'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' हा सिनेमा आला होता. यात अक्षयने पत्रकार आणि नंतर मनमोहन सिंह यांचे स्वीय्य सहाय्यक राहिलेले संजय बारू यांचं पात्र साकारलं होतं. या सिनेमासह अक्षयच्या या भूमिकेची विशेष चर्चा झाली होती.