
धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्या दोन मुली अजीता आणि विजेता देओल बॉलिवूडपासून दूर आहेत.. अजीता आणि विजेता यांची मुलं देखील आता मोठी झाली आहे... पण त्यांची मुलं देखील आईप्रमाणे बॉलिवूडपासून दूर आहेत.. विजेता देओल हिची मुलगी एक प्रसिद्ध लेखिका आहे...

धर्मेंद्र यांच्या कुटुंबातील काही सदस्य बॉलिवूड पासून दूर आहेत. पण त्यांची एक नात लेखण क्षेत्रात उच्च स्थानी आहे.. धर्मेंद्र यांची नात माध्यमांसमोर देखील फार क्वचित येते...

धर्मेंद्र यांची नात प्रेरणा गिल बॉलिवूडपासून दूर आहे... पण लेखण क्षेत्रात प्रेरणा हिने स्वतःचं वर्चस्व प्रस्तापित केलं आहे. सध्या फक्त आणि फक्त धर्मेंद्र यांच्या नातीची चर्चा रंगत आहे..

धर्मेंद्र यांची पहिली मुलगी विजेता देओल 61 वर्षांची आहे. तिचा जन्म 21 जून 1962 रोजी झाला. विजेताने उद्योजक विवेक गिलसोबत लग्न केलं आहे. 17 डिसेंबर 1988 रोजी दोघांचे लग्न झालं. विजेता देओल 'राजकमल होल्डिंग्स अँड ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड'च्या संचालक आहेत. विजेता - विवेक यांच्या मुलीचं नाव प्रेरणा गिल असं आहे.

प्रेरणा गिल चित्रपट कुटुंबातील असूनही ती झगमगत्या विश्वापासून दूर राहून साहित्य क्षेत्रात आपलं योगदान देत आहे. प्रेरणा गिल हिची आतापर्यंत तीन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. तिचं पहिले पुस्तक 'द फिमेल सुपरनॅचरल बीइंग इन कंटेम्पररी गॉथिक लिटरेचर अँड फिल्म' हे 2015 साली प्रकाशित झालं..

यानंतर प्रेरणा हिने 'इंडियाज मोस्ट हॉन्टेड: टेल्स ऑफ टेरिफायिंग प्लेसेस' (2019) आणि 'द शेफर्ड लाईज' (2010) ही पुस्तके लिहिली. महत्त्वाचं म्हणजे, सनी, बॉबी आणि अभय देओल अनेकदा त्यांच्या सोशल अकाऊंटवर त्यांच्या भाचीच्या पुस्तकांची पोस्ट शेअर करतात. फार कमी लोकांना माहित आहे की त्यांनी शेअर केलेली पुस्तके त्यांच्या भाचीने लिहिलेली आहेत. सध्या फक्त आणि फक्त प्रेरणी गिल हिची चर्चा रंगत आहे..