Thakur Anup Sigh Birthday : ठाकूर अनुप सिंहचे लाखो फॉलोअर्स, तो केवळ एकाच व्यक्तीला करतो फॉलो, कोण आहे ही खास व्यक्ती?

| Updated on: Mar 23, 2022 | 12:37 PM

अभिनेता ठाकूर अनुप सिंह याचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्याविषयी जाणून घेऊयात...

1 / 5
अभिनेता ठाकूर अनुप सिंह याने महाभारत या मालिकेत काम केलं. या मालिकेतील धृतराष्ट्र हे त्याचं पात्र अनेकांना आवडलं. अनुपचा जन्म 23 मार्च 1989 रोजी झाला. अनुप हा उदयपूरमध्ये राहणारा असून त्याने द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण या मालिकेतून करिअरची सुरुवात केली. बजरंगबली, चंद्रगुप्त मौर्य यांसारख्या पौराणिक आणि ऐतिहासिक मालिकांमध्ये त्याने काम केलंय.

2 / 5
ठाकूर अनुप सिंह हा केवळ अभिनेता नाही तर तो बॉडी बिल्डरही आहे. त्याने अनेक शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. गेल्या काही दिवसांपासून अनुप त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे. सहा महिन्यात त्याने 15 किलो वजन कमी केलं आहे.

3 / 5
ठाकूर अनुप सिंहला सोशल मीडियावर अनेक फॉलोव्हर्स आहेत. त्याला एक मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात. पण तुम्हाला माहितीये का की ठाकूर अनुप सिंह इन्स्टाग्रामवर केवळ एकाच व्यक्तीला फॉलो करतो. ठाकूर अनुप सिंह हा फक्त ठाकूर अर्जून सिंहला फॉलो करतो. ठाकूर अर्जून सिंह हे वकील, लेखक आणि फुटबॉल प्लेयर आहेत.

4 / 5
आपल्या फिटनेसबद्दल अनुपने एका मुलाखतीत सांगितलं, "सकाळी लवकर उठा आणि तुमच्या दिवसाची सुरुवात लवकर करा. पहाटे उपाशी पोटी केलेल्या कार्डिओमुळे केवळ फॅट्स बर्न होत नाहीत तर दिवसभर तुमची ऊर्जा टिकून राहते. मी दिवसातून पाच वेळा थोड्या थोड्या प्रमाणात खातो. शक्यतो जंक फूड खाणं टाळतो."

5 / 5
अनुपच्या ट्रान्सफॉर्मेशनवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स केले आहेत. महाभारत या मालिकेतील भूमिकेसाठी त्याने वजन वाढवलं होतं. सहा महिने प्रत्येक गोष्टीचं पालन करत त्याने 15 किलो वजन कमी केलं. यावेळी अनेकांनी त्याला त्याचं फिटनेस मंत्र काय आहे, याबद्दल विचारलं.