
अदिती राव हैदरीने (Aditi Rao Hydari) तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात मल्याळम सिनेमा ‘प्रजापती’ (Prajapathi) मधून केली होती. तिने बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. पण अभिनेत्रीला स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही.

अदिती बॉलिवूडमध्ये अव्वल अभिनेत्रींच्या यादीत नसली तरी, अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. दिती राव हैदरी कायम तिच्या ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते.

आता देखील अभिनेत्रीने शाही ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. अदिती हिचा जन्म देखील हैदराबाद येथील एका राजघराण्यात झाला आहे.

सध्या अदीतीचे काही फोटो सोशलमीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे..

अदिती कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अदिती लवकरच 'हिरा मंडी' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.