
अनुष्का शर्मा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. दोन मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीने बॉलिवडूमधून ब्रेक घेतला.

आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे नाही तर, खास फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

पांढरा शर्ट आणि लाल जीन्समध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे. अभिनेत्रीच्या अदांवर चाहते फिदा झाले आहे. दोन मुलांच्या जन्मानंतर अनुष्काने स्वतःला फिट ठेवलं आहे.

लग्नानंतर अभिनेत्रीने 2021 मध्ये लेक वामिका हिला जन्म दिला. त्यानंतर 2023 मध्ये विराट – अनुष्का यांनी अकाय याचं जगात स्वागत केलं.

अनुष्का सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. सध्या सर्वत्र अनुष्का शर्माची चर्चा रंगली आहे.