
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाची सध्या धामधूम पाहायला मिळत आहे. या दोघांच्या लग्नसोहळ्याला सेलिब्रिटी हजेरी लावत आहेत. अभिनेत्री जिनिलिया देशमुख आणि अभिनेता रितेश देशमुख देखील या सोहळ्यावा उपस्थित होते.

राधिका-अनंतच्या लग्नाच्या संगीत सोहळ्याला जिनिलिया आणि रितेश देशमुख यांनी हजेरी लावली. यावेळी या दोघांनी खास लूक केला होता. याची सोशल मीडियावर चर्चा होतेय.

मोरपंखी रंगाचा डिझायनर आऊटफिट जिनिलियाने परिधान केला होता. मी कधीच हरत नाही. मी एकतर जिंकते किंवा शिकते, असं म्हणत जिनिलियाने हे खास फोटो शेअर केलेत.

जिनिलियाचा हा क्लासी लूक नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. अनेकांनी कमेंट करत तिच्या या लूकचं कौतुक केलंय. वहिनी तुम्ही कमाल दिसताय, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

जिनिलिया वेगवेगळ्या स्टाईल कॅरी करत असते. स्काय ब्लू कलरच्या आऊटफिटमध्येही ती तितकीच सुंदर दिसतेय. तर कलफुल ड्रेसमधला जिनिलियाचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे.