
जान्हवीने नुकताच साडीवर फोटोशूट केलं आहे. पारंपरिक फोटोशूटमध्ये जान्हवी प्रचंड सुंदर दिसत आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

जान्हवीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर साडीतील फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

गोल्डन रंगाच्या साडीवर हे फोटोशूट जान्हवी कपूर हिने केले आहे. जान्हवी कायम वेग-वेगळ्या फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. जान्हवी कपूर अनेकदा तिच्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांची मने जिंकत असते.

जान्हवी हिने 'धडक' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागेवळून पाहिलं नाही. पहिल्या सिनेमानंतर जान्हवी हिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री अव्वल स्थानी आहे.