
अभिनेत्री कंगना रनौत आणि एकता कपूर यांच्या 'लॉकअप' या रिअॅलिटी शोचा ट्रेलर लवकरच लॉच होणार आहे. त्याआधी गुरूद्वाऱ्यात दर्शनासाठी गेल्या होत्या.

अभिनेत्री कंगना रनौत आणि एकता कपूर यांनी दिल्लीतील बंगला साहिब गुरूद्वाऱ्यात जात दर्शन घेतलं.

कंगनाने यावेळी निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर एकताने पांढऱ्या रंगाचा सूट घातला होता.

कंगना रनौतचा नवा रिअॅलिटी शो ‘लॉक अप’ येत्या 27 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कंगना पहिल्यांदाच रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसणार आहे.

कंगना रनौत आणि एकता कपूर या दोघींनी ‘शूट आऊट वडाळा’मध्ये एकत्र काम केलं होतं. त्यानंतरचा ‘जजमेंटल है क्या’ हा सिनेमा तिकीटबारीवर चालला नाही पण त्यामुळे कंगना-एकताची मैत्री घट्ट झाली.