
अभिनेत्री करिश्मा कपूर तिच्या खास अदांनी तिच्या चाहत्यांचं मन जिंकते. तिने फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले की कमेंटचा अक्षरश: पाऊस पडतो. आताही तिने असाच एक फोटो शेअर केला आहे.

करिश्माने नुकतेच काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवरही चाहत्यांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. यात काही भन्नाट कमेंट पहायला मिळत आहेत.

करिश्माने फुलाफुलांचा एक ड्रेस घातलाय आणि त्यावर केलेलं फोटोशूट तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. याला तिने "Stay wild, Flower child", असं कॅप्शन दिलं आहे. आता स्वत: करिश्मानेच स्वत:ला लहान मुलीची उपमा दिल्यावर नेटकरी शांत कसे बसतील?

नेटकऱ्यांनी करिश्माच्या या फोटोवर कमेंट केल्यात. यात एकाने "तिला तू अगदी लहान मुलीसारखी दिसतेस", असं म्हटलंय. तर दुसरा म्हणतो "करिश्मा, तुझ्या चेहऱ्यावर वय दिसतंच नाही तू अगदीच लहान दिसते आहे" शिवाय आणखी एकजण म्हणतो "तू माझ्या हृदयात वसली आहेस. तू मला खूप आवडतेस."

करिश्माने काही दिवसांआधी असाच हटके फोटो शेअर केला होता. याला तिने "Life is art , Live it in Colours", असं कॅप्शन दिलं होतं. तिच्या या फोटोला 85 हजारांहून अधिकांनी लाईक करत पसंती दिली होती. तर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करून "तू खूप सुंदर दिसते आहेस", असं म्हटलंय.