
अभिनेत्री कतरिना कैफ बॉलिवूडमधील अनेक कार्यक्रमांसाठी उपस्थित असते. नुकताच कतरिना अभिनेता आमिर खान याची लेक आयरा खान हिच्या रिसेप्शनसाठी उपस्थित होती. रिसेप्शनमध्ये कतरिना हिच्यावर सर्वांच्या नजरा यावून थांबल्या...

कतरिना कैफ हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कतरिना कैफ हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

पारंपरिक लूकमध्ये कतरिना हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. कतरिना कायम नव्या लूकमध्ये फोटोशूट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील अभिनेत्रीच्या पारंपरिक लूकची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री कतरिना कैफ ही तिच्या सौंदर्यासाठी आणि अभिनयासाठी नावाजली जाते. तिचे लाखो-करोडो फॅन्स आहेत. कतरिना या इंडस्ट्रीत 20 वर्षांहून अधिक काळ आहे.

कतरिना कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.