AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीमधून बाहेर पडून CM होण्याचा अजितदादांचा प्लान; काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, विमान अपघातावरही महत्त्वाचे बोलले

महायुतीमधून बाहेर पडून CM होण्याचा अजितदादांचा प्लान होता, असं विधान काँग्रेसच्या बड्या नेत्याने केलं आहे. काँग्रेस नेत्याच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महायुतीमधून बाहेर पडून CM होण्याचा अजितदादांचा प्लान; काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, विमान अपघातावरही महत्त्वाचे बोलले
ajit pawar news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 12, 2026 | 10:00 AM
Share

राष्ट्रवादीच्या विलिनी‍करणावरून दादांच्या राष्ट्रवादीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीच्या विलिीनीकरणावरून नेत्यांच्या बैठकांची मालिका सुरूच आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरुन सुनेत्रा पवार यांनीही एक विधान करून सस्पेन्स वाढवला आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान काँग्रेस नेते अतुल लोंढे यांच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे. महायुतीमधून बाहेर पडून CM होण्याचा अजितदादांचा प्लान होता, असा दावा काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी केला आहे. लोंढे यांच्या दाव्याने चर्चांना उधाण आलं आहे.

अतुल लोंढे यांनी माध्यमांशी संवाद साधत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मोठं भाष्य केलं. अतुल लोंढे म्हणाले, ‘आज मी शरद पवार यांची भेट घेणार आहे.  त्यांना आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी जे पुस्तक लिहिलं आहे, ते पुस्तक भेट देणार आहे. काल देखील मी संजय राऊत आणि अनेक संपादकांची भेट घेऊन पुस्तक भेट दिली.  शरद पवार हे कधीच सत्तेत जाणार नाही आहेत, हे मला माहीत आहे. त्यांना सत्तेत जाण्याची संधी ही 1999 साली मिळाली होती. ते देखील अटल बिहारी वाजपेयी यांच्या सोबत…पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर विचारधारा सोडली नाही.  त्यामुळे पवारसाहेब काय सत्तेत जाणार नाही हे मला ठाम माहीत आहे’.

‘अजित पवार असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या संदर्भात चर्चा झाली होती. विलिनीकरण १२ फेब्रुवारी रोजी होणार होतं, ही माहिती आता तटकरे यांनी सुद्धा दिली आहे. जेव्हा या विलनीकरणाच्या चर्चा होत होत्या. तेव्हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे आणि पिंपरी-चिंचवडची निवडणूक एकत्रित लढत होते. अजित पवार हे भाजपच्या विरोधात बोलत होते आणि त्यांनी 1995 च्या युतीच्या सरकारच्या इरिगेशनच्या घोटाळ्याच्या संदर्भात फाईल समोर आणणार असंही सांगितलं होत आणि त्यानंतर त्यांचा विमान अपघात झाला, असा दावा लोंढे यांनी केला.

‘अजित पवार यांचा विमान अपघात आहे की घातपात आहे, यावर सुद्धा अनेक प्रश्न आहे. मी तेव्हाच सांगितलं होत की, अजित पवार यांच्या विमान अपघातातील विमानाचा ब्लॅक बॉक्स हा कसा हलू शकतो? हा ब्लॅक बॉक्स हा विमानाच्या शेपटीत असतो आणि शेपटी कधी जळत नसते, असे अनेक प्रश्न आहे. पण तपास यासंदर्भातील योग्य दिशेने होताना पाहायला मिळत नाही आहे.  तसेच सुनेत्रा पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी या विमान अपघात प्रकरणात केली आहे. पण ती सुद्धा मान्य झाली नाही. आता नेमकं काय सुरू आहे, माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे की, त्यांनी या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने केला पाहिजे, असे लोंढे म्हणाले.

Follow Us
मुंबईकरांनो सावधान! दिवाळीनंतर प्रदूषणाचा पुन्हा धुरळा; AQI तब्बल...
Mumbai Air Pollution : मुंबईकरांनो सावधान! दिवाळीनंतर प्रदूषणाचा पुन्हा धुरळा; AQI तब्बल...
हार्बर मार्गावरील स्थानकांवर छठपूजेची गाणी; महाराष्ट्र संघर्ष समितीचा
Harbour Line : हार्बर मार्गावरील स्थानकांवर छठपूजेची गाणी; महाराष्ट्र संघर्ष समितीचा आक्षेप, रेल्वे प्रशासनावर आरोप
मॉर्निंग वॉकदरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड अचानक कोसळले; प्रकृती....
Jagdeep Dhankhar Health Update : मॉर्निंग वॉकदरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड अचानक कोसळले; प्रकृती बिघडल्याने AIIMS रुग्णालयात दाखल, डॉक्टरांची विशेष टीम तैनात
सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट....
Sunil Tatkare Meets Devendra Fadnavis : सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट, भेटीमागचं नेमकं कारण काय?
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 62,370 कोटींचं खत अनुदान मंजूर...
Rabi Season News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 62,370 कोटींचं खत अनुदान मंजूर; DAP ची गोणी मिळणार फक्त एवढ्या रुपयांना
आजपासून ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका; अमूलचं दूध महागलं, प्रति लिटर
Amul Products Price Hike : आजपासून ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका; अमूलचं दूध महागलं, प्रति लिटर एवढ्या रुपयांची दरवाढ
जशी वेळ येईल तशा...; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला....
Sunetra Pawar : जशी वेळ येईल तशा...; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पडदा कधी उठणार?
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र