
नेहमीच वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसणाऱ्या नोरा फतेहीचे काही फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती पारंपारिक भारतीय साडीमध्ये दिसत आहे.

नोरा फतेहीनं तिच्या फॅशन सेन्सनं इंटरनेटवर लोकांची मनं जिंकली आहेत. तिच्या चाहत्यांना तिचा हा अनोखा अंदाज पसंतीस उतरला आहे.

लाल बॉर्डर असलेल्या या साडीवर हातानं नक्षीदार चिकनकारी वर्क केलं आहे या साडीमध्ये नोरा फतेही कमालीची सुंदर दिसतेय.

नोरानं या साडीला लाल रंगाच्या ब्लाउजसोबत कॅरी केलं आहे, सोबतच तिनं फ्लोरल पॅटर्नमध्ये पांढऱ्या आणि हिरव्या स्टोनसह सोनेरी रंगाचा ऑक्सिडाइज्ड नेकलेस परिधान केला आहे.

नोराची ही साडी नवी दिल्लीत राहणाऱ्या भारतीय फॅशन डिझायनर अंजुल भंडारी यांनी डिझाईन केली आहे. तर नोरा फतेहीची फॅशन स्टायलिस्ट मेनका हरिसिंगानी, शुभ्रा शर्मा आणि चिंतन शाह यांनी स्टाईल केली आहे.