
परिणीती चोप्रा ही बॉलिवूडमधील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, परिणीती एक लूकअलाईक आहे, जी अगदी हुबेहूब अभिनेत्रीसारखी दिसते.

परिणीतीचे लूकअलाईक दुसरी कोणीही नसून अमेरिकन अभिनेत्री, मॉडेल आणि गायिक हेडन पेनटियरल आहे.

हेडन पेनटियरल नीबीसी सुपर हीरो सीरीजमधील क्लेअर बेनेट म्हणून आणि म्युझिकल ड्रामा नॅशव्हिलेमध्ये ज्युलिएट ब्रॉन्झ म्हणून प्रसिद्ध झाली आहे.

हेडन पेनटियरल गेल्या काही काळापासून चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांपासून दूर आहे. सोशल मीडियावरही ती कमी अॅक्टिव्ह झाली आहे.

याचवेळी परिणीतीचे 3 चित्रपट यावर्षी रिलीज झाले आहेत, ज्यात ‘द गर्ल ऑन द ट्रेन’, ‘संदीप और पिंकी फरार’ आणि ‘सायना’ यांचा समावेश आहे.