
'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवाला त्या स्टारपैकी एक आहे ज्यांना रातोरात यश मिळालं. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर ती पुन्हा चर्चेत आली आहे. नुकतंच तिनं नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

चमकदार ड्रेसमध्ये शेफाली जरीवालानं हे फोटोशूट केलं आहे. शेफाली जरीवाला सध्या सुट्टीवर आहे. यादरम्यान ती प्रचंड धमाल करत आहे.

शेफाली जरीवालाचे चाहते म्हणतात की, ती सध्या मालदीवमध्ये आहे.

शेफाली जरीवाला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे चाहते नेहमीच तिच्या फोटोंची आतुरतेनं वाट पाहत असतात.

2002 मध्ये 'कांटा लगा ...' हा म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला तेव्हा शेफाली जरीवाला प्रसिद्धीझोतात आली. तिचं हे गाणं अजूनही प्रसिद्ध आहे. या गाण्यानंतर ती इंडस्ट्रीत आली आणि तिनं 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटात भूमिका साकारली.