
साल 1983. यावर्षी एक सिनेमा आला आणि त्याने श्रीदेवीला मोठ्या पडद्यावरची हिरोईन केलं. सदमा या सिनेमात तिने अभिनेते कमल हसनसोबत काम केलं होतं. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं.

1987 साली मिस्टर इंडिया हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा सिनेमा आजही अनेकांना आवडतो. आजही या सिनेमाविषयी, श्रीदेवीच्या या सिनेमातील कामाविषयी बोललं जातं.

1989 साली आला चांदनी. या सिनेमात तिने ऋषी कपूरसोबत काम केलं. हा सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमातली गाणी आजही आवडीने ऐकली जातात. मेरे हाथों में नौ-नौ चुडिया हे गाणं याच चित्रपटातील.

चालबाज हा सिनेमाही सिनेरसिकांना आवडला. 1989 साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील गाणी आणि डायलॉग अनेकांच्या पसंतीस उतरले.

त्यानंतर आला लम्हे हा सिनेमा. 1991 साली आलेल्या या सिनेमातील श्रीदेवीच्या कामाचं कौतुक झालं. या सिनेमात तिच्यासोबत वहिदा रहमान, अनुपम खेर, अनिल कपूर दिसले होते.

मग 1994 साली लाडला हा सिनेमा आला. यातली श्रीदेवी आणि अनिल कपूर ही जोडी हिट ठरली. या सिनेमात रविना टंडनदेखील होती.