
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमच्या 'ए थर्स डे' या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन साठी यामी वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो शेअर करत आहे.

पांढऱ्या रंगाचा टॉप आणि ब्लॅक कलरच्या पॅन्टमधला तिचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरतोय.

पिवळ्या रंगाच्या ब्लेझरमधले हे फोटो यामीने तिच्या इन्स्टाला शेअर केले आणि या फोटोंवर लाईक्सचा अक्षरश: पाऊस पडला.

यामीने हा एक वेगळा फोटो शेअर केलाय. त्याला दोन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

लाल रंगाच्या या आऊटफिटमधला हा फोटो यामीने शनिवारी पोस्ट केला होता. याला तिने "शनिवारी अ थर्स डेसाठी तयार होतेय", असं कॅप्शन दिलंय.