
बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये अनेक सेलिब्रिटी प्रेमात पडताना दिसले आहेत, बिग बॉस ओटीटी दरम्यान राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांच्यात असंच काहीसं घडलं. या कपलची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगली आवडली आहे. आता या कपलची सर्वत्र चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत, काल राकेश आणि शमिता एका डिनर डेटवर एकत्र दिसले.

मुंबईच्या वरळी भागात डिनर डेटसाठी राकेश आणि शमिता पोहोचले होते. आता या कपलचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

शमिता शेट्टी लवकरच बिग बॉस 15 मध्ये जाणार आहे, त्याआधी हे दोघं बराच वेळ एकत्र घालवत आहेत. शमिता शेट्टी यावेळी खूप सुंदर दिसत होती. तिच्या चाहत्यांना हे फोटो प्रचंड आवडले आहेत. राकेश बापट बिग बॉस OTTमध्ये दिसला होता, प्रेक्षक अजूनही या कपलची केमिस्ट्री पसंत करत आहेत.

मुंबईत आज हे दोघं अतिशय सुंदर अंदाजात दिसले, या कपलला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.