
रुबीना दिलैक छोट्या पडद्यावरील उत्तम कलाकार आहे. तिनं आतापर्यंतच्या कारकिर्दीत एका पेक्षा एक शोमध्ये काम केलं आहे.

नुकतंच रुबीना अभिनेता अभिवन शुक्लासोबत बिग बॉस 14 मध्ये दिसली. अशा परिस्थितीत आता तिनं अभिनवचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

रुबिना बिग बॉसची विजेती होती. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं.

आता दोन्ही स्टार्स अनेकदा वैयक्तिक वेळ घालवताना दिसतात, म्हणूनच तिनं आता जे फोटो शेअर केले आहेत त्यात ती मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे.

दुसरीकडे, अभिनवबद्दल बोलायचं झालं तर, तो फोटोमध्ये पूर्ण स्वॅग स्टाईलमध्ये देखील दिसत आहे.

सध्या अभिनव आणि रुबीनाचे हे फोटो चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, चाहत्यांना दोघांची ही स्टाईल पसंत पडत आहे.