
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी खास फोटोशूट केलं आहे. त्यांच्या या फोटोंची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे.

कॉफी विथ करण या कार्यक्रमात हे दोघे हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमासाठी या दोघांनी हे खास फोटोशूट केलंय.

कॉफी विथ करण या कार्यक्रमात रणवीर सिंहने मोठा खुलासा केला आहे. 2015 मध्येच दीपिका आणि माझी एंगेजमेंट झाली होती, असं रणवीर म्हणाला आहे.

कॉफी विथ करणचा हा एपिसोड उद्या प्रदर्शित होणार आहे. या मुलाखतीसाठी चाहते उत्सुक आहेत.

हा एपिसोड कधी रिलीज होतोय, याची मी वाट पाहातोय. नंबर वन जोडी! तुमच्या मुलाखतीसाठी मी उत्सुक आहे, असं चाहता म्हणाला आहे.