
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री दीपिका पादुकोण ही तिच्या फॅशन सेन्ससाठी खास ओळखली जाते. पार्टी असो किंवा कॅज्युअल वेअर ती प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते.

आता नुकतंच दीपिकाला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. यावेळी दीपिकानं ग्रीन कलरचा हटके ड्रेस कॅरी केला होता.

या ड्रेससोबत तिनं चेक्सचं जॅकेट आणि व्हाईट शुज कॅरी केले होते.

दीपिकाचा हा लूक बघून तिच्या चाहत्यांना पती रणवीर सिंगची आठवण आली. कारण नेहमी रणवीर अशा प्रकारच्या जॅकेटमध्ये दिसतो.

दीपिकाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच ‘पठाण’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात दीपिकासोबत शाहरुख खान आणि जॉन मुख्य भूमिकेत असतील.