
गोपी बहू म्हणून खास ओळख निर्माण करणारी टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी ही कायमच चर्चेत असते. नुकताच एक पोस्ट रिशेअर करत द केरळ स्टोरी चित्रपटाबद्दल देवोलीना हिने मोठे भाष्य केल्याने ती चर्चेत आहे.

एका मुलीने पोस्ट शेअर करत म्हटले होते की, माझ्या मैत्रिणीने तिच्या मुस्लिम बायफ्रेंडला द केरळ स्टोरी चित्रपट बघायला जाऊ म्हटल्याने तो नाराज झाला आणि त्यांच्यामध्ये वाद झाला आणि ब्रेकअप देखील झाले.

पोस्ट रिशेअर करत देवोलीना भट्टाचार्जी म्हणाली की, माझा पती हा मुस्लिम असून तो आणि मी द केरळ स्टोरी चित्रपट बघायला गेलो. इतकेच नाही तर माझ्या पतीला द केरळ स्टोरी हा चित्रपट देखील आवडला.

चित्रपट बघितल्यावर माझा पती ऑफेंस देखील नव्हता आणि मला असे वाटते की प्रत्येक भारतीय असे असलेच पाहिजेत. आता देवोलीना भट्टाचार्जी हिची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.

द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज झाल्यापासून मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. अनेकांनी थेट या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली तर काही राज्यात चित्रपटवर बंदी आहे.