AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘देवयानी’ फेम शिवानी सुर्वे लवकर प्रेक्षकांच्या भेटीला, नव्या चित्रपटातून करणार दमदार एण्ट्री!

आजपासून सिनेमागृह सुरू करण्यात येत आहेत, त्यामुळे सिनेसृष्टीला पुन्हा सुगीचे दिवस पाहायला मिळतील यात काही शंका नाही. त्याच मुहूर्तावर नव्या सिनेमांच्या घोषणा देखील होत आहेत. लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वे ही लवकरच निर्माते दिपक राणे यांच्या नव्या सिनेमात झळकणार आहे.

| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Oct 23, 2021 | 2:53 PM
Share
आजपासून सिनेमागृह सुरू करण्यात येत आहेत, त्यामुळे सिनेसृष्टीला पुन्हा सुगीचे दिवस पाहायला मिळतील यात काही शंका नाही. त्याच मुहूर्तावर नव्या सिनेमांच्या घोषणा देखील होत आहेत. लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वे ही लवकरच निर्माते दिपक राणे यांच्या नव्या सिनेमात झळकणार आहे.

आजपासून सिनेमागृह सुरू करण्यात येत आहेत, त्यामुळे सिनेसृष्टीला पुन्हा सुगीचे दिवस पाहायला मिळतील यात काही शंका नाही. त्याच मुहूर्तावर नव्या सिनेमांच्या घोषणा देखील होत आहेत. लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वे ही लवकरच निर्माते दिपक राणे यांच्या नव्या सिनेमात झळकणार आहे.

1 / 5
या सिनेमात शिवानीसोबत अजून कोणकोणते कलाकार असतील ही माहिती सध्या गुलदस्त्यात आहे. गेल्या दहा वर्षातल्या यशस्वी टिव्ही कारकिर्दीनंतर ‘बिग बॉस मराठी’ हा रिएलिटी शो तिने केला. 2016ला शिवानी ‘घंटा’ सिनेमात झळकली होती. त्यानंतर 2019मध्ये अभिनेता अंकुश चौधरीसोबतच्या ‘ट्रिपल सीट’ सिनेमात ती दिसली.

2 / 5
शिवाय 2020मध्ये तिला चार मानाचे नामांकित पुरस्कार मिळाले. त्यात सिटी सिने अवॉडर्समध्ये शिवानीला ‘ट्रिपल सीट’ सिनेमासाठी ‘सर्वोत्कृष्ट डेब्युटंट अभिनेत्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच, तिचा चाहता वर्ग ही अफाट आहे.

3 / 5
अभिनेत्री शिवानी सुर्वे तिच्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगते, “मी या सिनेमासाठी फारच उत्सुक आहे. जेव्हा मी पहिल्यांदा ही कथा ऐकली. त्यानंतर मी क्षणाचाही विलंब न लावता त्वरीत होकार कळवला. खरंतर या सिनेमातील माझी भूमिका खूपच चॅलेंजींग आहे. आणि मी पहिल्यांदाच माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी चॅलेंजींग करणार आहे. सध्या मी सिनेमातील भूमिकेची तयारी करत आहे. तर या सिनेमाच शुटींग लवकरच सुरू होईल.”

4 / 5
आता अभिनेत्री शिवानी सुर्वे या सिनेमात कोणत्या भूमिकेत दिसेल हे पाहाणं, तिच्या चाहत्यांसाठी औत्सुक्याचं ठरेल.

5 / 5
Follow Us
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...

आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट, महायुतीत धुसफूस कायम
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..
Aamir Khan Meet Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं काय घडतंय? कारण अद्याप गुलदस्त्यात
पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
Mumbai : पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray; स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण

कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
Gokul Milk Union Election 2026 : कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं...
Navnath Ban : उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं; नवनाथ बन यांचा ठाकरे-राऊतांवर निशाणा