
अभिनेत्री ऐश्वर्या राय आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. ऐश्वर्या हिने १९९४ मध्ये मिस वर्ल्डच्या किताबावर स्वतःचं नाव कोरलं. ज्यामुळे अभिनेत्रीचं सर्वत्र कौतुक झालं.

अभिनेत्री जवळपास दोन वर्ष बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. अभिनेत्रीने आतापर्यंत जवळपास ४५ पेक्षा जास्त सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

अभिनेत्रीने 'इरुवर' या तामिळ सिनेमाच्या माध्यमातून अभिनयची सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने 'और प्यार हो गया' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

ऐश्वार्या राय २००३ मध्ये कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ज्यूरी सदस्य म्हणून मान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली. फिल्म फेस्टिवलमध्ये अभिनेत्री वेग-वेगळ्या लूकमध्ये दिसते.

ओपरा विन्फ्रे शोमध्ये आमंत्रित होणारी ऐश्वर्या पहिली भारतीय महिला ठरली आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्री जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहे. भारतातच नाही तर, परदेशात देखील ऐश्वर्या हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.