
मानसी नाईक ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘मर्डर मिस्ट्री’ या चित्रपटातील ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यानं मानसीला खास ओळख दिली. तसेच ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यातील तिच्या आयटम डान्सनं लोकांनी भुरळ पडली होती.

आता मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा या दोघांनी दिवाळी निमित्त खास फोटोशूट केलं आहे. एकदम हटके आणि पारंपारिक अवतारात हे फोटोशूट करण्यात आलं.

मागील वर्षीच अभिनेत्री मानसी नाईक बॉक्सर प्रदीप खरेरासोबत लग्नबंधनात अडकली आहे. दोघांची ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

अगदी थाटामाटात दोघांचं लग्न पार पडलं होतं. आता हे दोघं नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना कपल गोल्स देत आहेत.

मानसी आणि प्रदीप लवकरच आता आई-वडिल होणार आहेत. त्यामुळे दोघांच्या चाहत्यांमध्ये सुद्धा एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय.