AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kitchen Kallakar: एकाच मंचावर एकनाथ खडसे-किरीट सोमय्या; जुन्या मैत्रीचे ताजे किस्से…

झी मराठी वाहिनीवरील 'किचन कल्लाकार' (Kitchen Kallakar) हा कार्यक्रम प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करतोय. आता किचन कल्लाकारच्या आगामी भागात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) हे प्रेक्षकांच्या भेटीस येतील.

| Updated on: Apr 11, 2022 | 12:14 PM
Share
झी मराठी वाहिनीवरील 'किचन कल्लाकार' (Kitchen Kallakar) हा कार्यक्रम प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करतोय. आतापर्यंत अनेक कलाकारांनी तसंच विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी या किचनमध्ये कल्ला केला आहे. नुकताच या कार्यक्रमात राजकीय धुरळा पाहायला मिळाला. आता किचन कल्लाकारच्या आगामी भागात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) हे प्रेक्षकांच्या भेटीस येतील.

1 / 5
या खास एपिसोडची झलक झी मराठीच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमधून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. यामध्ये एकनाथ खडसे आणि किरीट सोमय्या यांनी किचन कल्लाकारच्या मंचावर हजेरी लावल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे राजकीय मैदानात नेहमी एकमेकांवर आरोप करणारे हे चेहरे या मंचावर मात्र एकमेकांची कडकडून गळाभेट घेताना दिसले.

2 / 5
'किचन कल्लाकार'च्या किचरनमध्ये खडसे आणि सोमय्यांचं वेगळं रुप प्रेक्षकांना पहायला मिळेल. किचनमध्ये पदार्थ बनवत असतानाच त्यांच्यासोबत विविध गेम्ससुद्धा खेळले गेले. गप्पांसह काही विनोदही रंगले.

3 / 5
या एपिसोडमध्ये दोघांना काही फोटो दाखवले गेले आणि ते फोटो पाहून मनात येणारं गाणं त्यांना गाऊन दाखवायचं होतं. जेव्हा संजय राऊत यांचा फोटो समोर आला, तेव्हा खडसेंनी 'आ देखे जरा, किसमे कितना है दम' हे गाणं गायलं. तर सोमय्यांनी थेट हातात फडकं घेत किचन पुसायला सुरुवात केली. 'मी साफसफाईला सुरुवात करतो' असं ते म्हणताच एकच हशा पिकला.

4 / 5
राजकीय मैदानातील हे स्पर्धक या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आले व यानिमित्त त्यांनी किचनमध्ये जोरदार कल्ला केला. राजकारणात कल्ला करणारे हे नेते किचनमध्ये पदार्थ बनवून महाराजांना खुश करू शकतील का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. किचन कल्लाकारचा हा खास एपिसोड 13 एप्रिल रोजी बुधवारी रात्री 9.30 वाजता प्रेक्षकांना पहायला मिळेल.

5 / 5
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.