
सध्या नवरात्री हा सण जोशात साजरा केला जात आहे. या दिवसांत नऊ रंगांना विशेष स्थानं दिलं जातं. सगळ्या स्त्रिया या दिवसांत प्रत्येक दिवशीच्या रंगानुसार पेहराव परिधान करतात.

या ट्रेंडची भुरळ अभिनेत्रीना नाही पडली तर नवलच! आता अभिनेत्री अश्विनी महांगडेने सुंदर फोटोशूट केलं आहे.

या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्याही चांगलेच पसंतीस उतरले आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे.

छोट्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्येची अर्थात ‘राणू अक्कां’ची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडेने साकारली आहे. रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान नावाने सेवाभावी संस्थाही ती चालवते. या संस्थेअंतर्गत आजवर तिने अनेक उपक्रम राबवले आहेत.