
सोशल मीडियावर लाखो लोक टीव्ही अभिनेत्री एरिका फर्नांडिसला फॉलो करतात. एरिकाचे लाखो चाहते आहेत. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांसाठी बोल्ड फोटो शेअर करत असते.

एरिकाचा बोल्ड आणि पारंपरिक दोन्ही लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरतो. तिचे फोटो पोस्ट होताच सोशल मीडियावर व्हायरल होतात. एरिकानं आजही तिचे बोल्ड फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

एरिका फोटोंमध्ये जंपसूट परिधान करुन दिसत आहे. तिनं खूप हलका मेकअप केला आहे. फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

चाहत्यांसोबतच बॉलिवूड सेलेब्सही एरिकाच्या फोटोंवर कमेंट करत आहेत.

सध्या एरिकाचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.

एरिका सध्या 'कुछ रंग प्यार के ऐसी भी' या मालिकेत दिसत आहे. तिला शोमध्ये प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे.