
अभिनेत्री अहाना कुमरा हिने अगदी कमी वेळामध्ये बाॅलिवूडमध्ये खास ओळख मिळवलीये. अहाना कुमरा हिने हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अहाना कुमरा हिचा एक व्हिडीओ आणि काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे हा व्हिडीओ स्वत: अहाना कुमरा हिने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मुंबईमध्ये एका कार्यक्रमामधून बाहेर पडत असताना अहाना कुमरा हिच्या भोवती चाहत्यांनी गर्दी केली.

चाहत्यांसोबत फोटो काढण्यासाठी अहाना कुमरा थांबली. मात्र, यादरम्यान फोटो काढत असताना एक चाहता हा अहाना कुमरा हिला मागून हात लावतो.

चाहत्याने हात लावताच अहाना कुमरा ही संतापली आणि तिने थेट या चाहत्याला हात लावायचा नाही म्हणते तिथून आणि निघून जाते. आता अहाना कुमरा हिचा हाच व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

अहाना कुमरा हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. अहाना कुमरा ही देखील नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते.