
देशभरात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. दिड दिवसांच्या गणपतीचं काल विसरजन सुद्धा झालं आहे. बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. शिल्पा शेट्टीच्या घरी दरवर्षी गणपती बाप्पाचं आगमन होत असतं. आज तिनं घरीच तिच्या बाप्पाचं विसर्जन केलं.

शिल्पा शेट्टी गणपती बाप्पााला घेऊन तिच्या घराबाहेर आली होती. यावेळी तिच्यासोबत तिचा मुलगा वियान सुद्धा इथं दिसला.

शिल्पा शेट्टीने गणपती बाप्पासोबत अनेक फोटो क्लिक केले.

शिल्पा शेट्टीने गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केलं आहे. मूर्तीसोबत शिल्पा शेट्टी खूप सुंदर दिसत होती.

लग्नानंतर शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राशिवाय ही पहिली गणेश चतुर्थी साजरी केली.