
‘12/24 करोल बाग’ या शोच्या सेटवर अभिनेता रवी आणि सरगुन यांची भेट झाली. या शो दरम्यान दोघंही एकमेकांच्या जवळ आले. सरगुननं त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं होतं, रवीला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ मुलाची भूमिका साकारायची होती. निर्मात्यांनी आणि फोटोग्राउर्सनी मला रवीचे फोटो दाखवले आणि माझी प्रतिक्रिया विचारली, मी म्हणाले… ‘छी….’. पण मग एक दिवस आम्हाला शूट करायचं होतं आणि रवीने माझ्या व्हॅनिटीला नॉक केलं. लाल रंगाच्या जॅकेटमध्ये एक माणूस मस्त दिसत होता. नंतर मला कळलं की रवीला शोमध्ये माझ्या नवऱ्याची भूमिका साकारायची आहे.

रवी आणि सरगुन पुन्हा एकमेकांना भेटले आणि मित्र झाले. त्यानंतर दोघंही एकमेकांच्या जवळ आले. काही दिवसांच्या शूटिंगनंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांपैकी कोणीही आधी आलं नाही आणि प्रेमाची कबुली दिली नाही. सरगुननं सांगितलं होतं, ‘जेव्हा आम्ही मुंबईला आलो तेव्हा आम्हाला समजलं की आमच्यात मित्रांपेक्षा काहीतरी जास्त आहे. मग एक दिवशी रवीनं मला सांगितलं की तुला वाटत नाही की आपण डेट करत आहोत आणि मी म्हणाले हो मला वाटतंय की आपण डेट करतोय.

5 महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर, सरगुन आणि रवी यांनी त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केली आणि ते टीव्हीच्या आवडत्या जोडींपैकी एक झाले.

रवीने अतिशय फिल्मी पद्धतीने सरगुनला प्रपोज केलं होतं. ‘नच बलिये सीझन 5’ मधील एका एपिसोडमध्ये त्यांच्या डान्सनंतर, रवीनं सरगुनला गुडघ्यांवर प्रपोज केलं. यानंतर 1 वर्षांनी दोघांचं लग्न झालं.

सरगुनच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, टीव्हीपासून तिच्या करिअरची सुरुवात झाली त्यानंतर, आज ती पंजाबी फिल्म इंडस्ट्रीच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक हिट पंजाबी गाणी आणि चित्रपट दिले आहेत.