
आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाड़ी हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे आलियाने पहिल्यांदाच संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली काम केले आहे.

या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या कमाईचा आकडा हा वाढतच चाललेला आहे.

चित्रपटातील आलिया भट्टच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. गंगूबाईची हुबेहुब भूमिका करत आलियाने सर्वांची मने जिंकली आहेत.

पहिल्या दिवशी 10.50 कोटी, दुसऱ्या दिवशी 13.32 कोटींच्या कमाईनंतर रविवारी चित्रपटाने 15 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाने 3 दिवसांत 38.32 कोटींची कमाई केली आहे.

अभिनेत्री आलिया भट आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या सिनेमाने मागच्या काही दिवसांपासून करोडोंचा गल्ला जमवलाय.