
आज सगळ्यांच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे. गेले अनेक दिवस स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेतील संजना म्हणजेच रुपाली भोसलेच्या घरी बाप्पाचं झालं आगमन झालंय. रुपालीनं तिच्या घरच्या बाप्पासोबत मस्त सेल्फीसुद्धा क्लिक केला आहे.

‘गणपती बाप्पा मोरया! बाप्पाच आगमन म्हणजेच आनंद आणि समाधान. या वर्षीचा आमचा देखावा 'टोकियो ऑलिम्पिक 2020" भारतासाठी पदक मिळवलेल्या सर्व खेळाडूंचा सन्मान आणि त्यांचं खूप कौतुक???’ असं कॅप्शन देत अभिनेते सुबोध भावे यांनी घरच्या बाप्पासोबत फोटो शेअर केला आहे.

सध्या ‘तुझी माझी रेशीम गाठ’ मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकत असलेल्या परीच्या घरी अर्थात मायराच्या घरीसुद्धा बाप्पा विराजमान झाले आहेत. सुंदर व्हिडीओ शेअर करत मायरानं आपल्या बाप्पाची झलक चाहत्यांना दिली आहे.

अभिनेता देवदत्त नागे यांच्या घरीसुद्धा बाप्पाचं आगमन झालं आहे. मास्त लावा सुरक्षित राहा असं कॅप्शन देत त्यांनी आपल्या बाप्पाचा फोटो शेअर केला आहे.

महाराष्ट्राची लाडकी ‘वीणी’ अर्थात बिग बॉस फेम अभिनेत्री वीणा जगतापच्या घरीसुद्धा मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. वीणानं सोशल मीडियावर बाप्पासोबत सुंदर फोटो शेअर केले आहेत.

महाराष्ट्राच्या लाडक्या शिवच्या अमरावतीमधील घरी सुद्धा मोठ्या उत्साहात बाप्पाचं आगमन झालं आहे. एवढंच नाही तर त्यानं बाप्पासोबत छान फोटोसुद्धा क्लिक केले आहेत.

प्रेक्षकांची लाडकी शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरातनं गणपती बाप्पा सोबत सुंदर फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

‘ गणेश चतुर्थीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्या तर्फे हार्दिक शुभेच्छा ! ’ असं कॅप्शन देत अभिनेत्री अक्षया देवधरनं बाप्पासोबत सुंदर फोटो शेअर केला आहे.