
आज राज्यात दही हंडीचा उत्साह आहे. खासकरुन मुंबईत-ठाण्यात दही हंडी जोरात सुरु आहे. आजच्या या उत्सवाला सेलिब्रिटी भेट देत आहेत.

मागाठाणे येथे तारामती चॅरिटेबल फऊंडेशनचा दहीहंडी उत्सव सुरु आहे. या ठिकाणी प्रसिद्ध नृत्यांगन गौतमी पाटील आली होती.

गौतमी पाटीलने या कार्यक्रमात तिच्या नृत्याच्या अदा दाखवल्या. तिच्या दिलखेचक अदानी उपस्थित प्रेक्षक घायाळ झाले.

गौतमी पाटीलने मागाठाणे येथील उत्सवात बिनधास्त नृत्य केलं. तिच्या वडिलांच नुकतच निधन झालं आहे.

गौतमी पाटीलबद्दल तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. तिने नृत्याला सुरुवात करताच ही क्रेझ अधिक प्रकर्षाने जाणवली. गौतमी पाटील हे नाव आज महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.