
अश्लील चित्रपट बनवण्याच्या आणि प्रसारित करण्याच्या आरोपांनी घेरलेल्या अभिनेत्री गेहना वशिष्ठानं सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

नुकतंच गेहना वशिष्ठनं टॉपलेस फोटो शेअर केले आहेत. यासोबतच तिने पोस्ट शेअर करून स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.

तिनं लिहिलं आहे की जेव्हा हयात रिजन्सीमध्ये असे फोटो क्लिक केले गेले, तेव्हा आम्ही तेथे सुमारे 20 लोकांसोबत होतो. कोणताही लैंगिक शोषण तिथे नव्हतं... ना मी दारू प्यायले आणि ना मी ज्यूस प्यायले... आणि मी पूर्णपणे जागरूक होते...

तिने पुढे लिहिलं की मी एका ऑटोमध्ये सेटवर गेले आणि दुसऱ्या ऑटोमध्ये सुखरूप परत आले ... त्यासाठी मला पैसेही मिळाले ... सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी 18 वर्षांच्या वर आहे आणि एक कलाकार आहे.

त्याचबरोबर गेहनाच्या या पोस्टवर राज कुंद्राचं नाव घेऊन नेटकऱ्यांनी खूप मजा घेतली आहे. गेहनाच्या फोटोवर कमेंट करताना एका युजरनं लिहिलं, 'राज कुंद्राचं शूटिंग चालू आहे का?'