
झी मराठी वाहिनीवर 'काय घडले त्या रात्री?' या आगामी मालिकेतून एका सुपरस्टारच्या मृत्यूचं गूढ उकललं जाणार आहे. अभिनेत्री स्वाती लिमये या मालिकेत झळकणार आहे.

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाशी साधर्म्य असलेल्या या मालिकेत मानसी साळवी मुख्य भूमिकेत आहे. स्वाती लिमये या मालिकेत नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

स्वाती लिमयेने याआधी घाडगे अँड सून मालिकेत भाग्यश्री घाडगेची व्यक्तिरेखा साकारली होती. मुख्य भूमिकांइतकीच तिच्या व्यक्तिरेखेचीही दखल घेतली गेली होती.

अभिनेत्री स्वाती लिमये सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. ती अनेक वेळा इन्स्टाग्रामवर सेल्फी शेअर करत असते.

स्वातीच्या सोशल मीडिया पोस्टना चाहत्यांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो.

सर्व फोटो स्वाती लिमये इन्स्टाग्राम अकाऊण्ट (iamswatilimaye)