
अभिनेत्री हीना खानचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर लाखो लोक तिला फॉलो करतात. प्रत्येकाला तिची अनोखी स्टाईल आवडते. ज्यामुळे तिचे प्रत्येक फोटो पोस्ट करताच व्हायरल होतात.

हीना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती तिचे फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. यावेळी तिनं पिवळ्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस लूक दाखवला आहे.

हीना खाननं सोशल मीडियावर पिवळ्या ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत ज्यात ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

फोटो शेअर करताना तिनं लिहिलं - तुम्ही जे पाहताय त्यापेक्षा मी अधिक आहे. तिचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. 2 लाखांहून अधिक लोकांनी हे फोटो लाईक केले आहेत.

हीनाच्या या स्टाईलनं सेलेब्सचीही मनं जिंकली आहेत. ते तिच्या पोस्टवर कमेंट्स करत आहेत.