
कंगना रानौत नेहमीच अनेक मुद्दय़ांवर स्पष्ट मत मांडते, अनेकदा एथनिक लूकमध्ये दिसते मात्र नुकतंच तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला. कंगनानं सोशल मीडियावर असे काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यात तिचा लूक खूपच हॉट दिसत आहे.

कंगना रानौतनं तिच्या आगामी 'धाकड' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. त्यानंतर तिनं आपल्या इन्स्टाग्रामवर रॅप अप पार्टीचे फोटो पोस्ट केले. चित्रपटात कंगना अॅक्शन अवतारात दिसणार आहे.

आता तिनं तिचे फोटो शेअर केले आहेत ज्यात ती बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. तिच्या मागे सूर्यास्त दिसतोय. ती एका तलावाच्या काठावर उभी राहून पोझ देतेय.

फोटोंमध्ये, कंगनानं पांढरे ब्रालेट परिधान केलं आहे आणि हायवेस्ट पँटसोबत कॅरी केलं आहे. लूक पूर्ण करण्यासाठी कंगनाने केसांचा बन बनवला आहे.

चाहते कंगनाच्या या फोटोचं कौतुक करत असताना, दुसरीकडे नेटकऱ्यांनी तिला तिच्या कपड्यांसाठी ट्रोल करायला सुरुवात केली. लोकांनी कंगनाच्या ड्रेसवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या ग्लॅमरस लूकसाठी लोकांनी कंगनाला खूप ट्रोल केलं आहे.

'धाकड' बद्दल बोलायचं झालं तर याचं दिग्दर्शन रजनीश राजी घई यांनी केलं आहे. हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. कंगना यात एजंट अग्नीची भूमिका साकारत आहे. चित्रपटात तिच्यासोबत अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता मुख्य भूमिकेत आहेत.